येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये । निढळावरी कर... निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें । ठेवुनी वाट मी पाहें ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये । आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरी आहे... पंढरपुरी आहे माझा मायबाप । हो माझा मायबाप, हो माझा मायबाप । येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०१॥ पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । गरुडावरी बैसोनि... गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला । हो माझा कैवारी आला ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०२॥ विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी । विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा... विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी । हो जीवे भावें ओवाळी ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०३॥ असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां । असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां । कृपादृष्टी पाहें... कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया । हो माझ्या पंढरीराया ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०४॥