तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया । संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥०१॥ मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक । तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया ॥०२॥ तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता । ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला ॥०३॥ तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या । पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥ मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ॥