उंदरावर बैसोनी दुडदुड तू येसी
उंदरावर बैसोनी दुडदुड तू येसी । हाती मोदक लाडू घेउनियां खासी ॥ भक्तांचे संकटी धावुनिया पावशी । दास विनवीती तुझिया चरणांसी ॥ जय देव जय देव जय गणराया । सकळ देवांआधीं तूं देव माझा जय देव ॥०१॥ भाद्रपदमार्सी होसी तू भोळा । आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ॥ कपाळी लावुनि कस्तुरी टिळा । तेने तू दिसशी सुंदर सावळा । जय देव जय देव ॥०२॥ प्रदोषाची दिवशी चंद्र श्रीपाला । समर्थी देव मोठा आकांत केला ॥ इंद्र येवोनी चरणी लागला । श्रीरामा बहुत शाप दिधला । जय देव जय देव ॥०३॥ पार्वतीच्या सूता तू ये गणनाथा । नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ॥ किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता । मला बुद्धी देई तू गणनाथा । जय देव जय देव ॥०४॥