Khawale Ganpati

खवळे महागणपती ट्रस्ट

तारामुंबरी, तालुका - देवगड

३२५ वर्षांची परंपरा असणारा ! नवसाला पावणारा हाकेला धावणारा खवळे महागणपती !

श्री खवळे महागणपती !

हे सरदार नाना खवळे यांचे घर आहे, हे देवघर म्हणून प्रसिद्ध आहे या महागणपतीचा महोत्सव सतत ३००+ वर्ष चालु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या. जहाजांचा प्रमुख असलेल्या सरदार शिव तांडेल यांचा वंश वाढत नव्हता. मालवण येथील मालडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पुजा करीत असत. अनेक वर्षे यांना संतान होत नव्हते. या नारायण मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे. ती त्याच्या स्वप्नात आली माझा मोठा उत्सव कर तुला पुत्ररत्न होईल. स्वप्नाप्रमाणे शिव तांडेलानी छत्रपतींच्या सरदाराला शोभेल असा १७०१ मध्ये गणपती उत्सव चालु केला. त्यांना पुत्ररत्न झाले. त्यानी त्याचे नाव गणोजी असे ठेवले. १७५६ साली गणोजी विजयदुर्गवर इंग्रजांशी लढताना पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली. आज हि या गणोजी सरदारांची समाधी तारामंबरी येथील खवळे घराण्याच्या शेतात आहे. आज हि परंपरेने त्या ठिकाणी दर सोमवारी दिवा, अगरबत्ती लावली जाते. याच गणोजी सरदारांची नववी, दहावी व अकरावी पिढी आज त्याच उत्साहात या महागणपतीचा उत्सव साजरा करीत आहेत.

नवसाला पावणारा, हाकेला धावणारा, २१ दिवसात तीन रूपांत दिसणारा महागणपती

|| गणपती बाप्पा मोरया ||

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स

Limca Certificate

श्री खवळे महागणपतीच्या उत्सवाला
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मान्यता मिळाली आहे. हा गौरव आमच्या परंपरेचा अभिमान वाढवणारा आहे व श्रद्धाळूंना प्रेरणा देणारा आहे.

|| गणपती बाप्पा मोरया ||

स्पर्धा २०२५

रील्स स्पर्धा २०२५

रील्स स्पर्धा २०२५

गणपतीची सजावट स्पर्धा २०२५

गणपतीची सजावट स्पर्धा २०२५

भजन स्पर्धा (पुरुष) २०२५

भजन स्पर्धा (पुरुष) २०२५

फोटो दर्शन

कार्यक्रम वेळापत्रक

दररोजचे कार्यक्रम

  • 🌅 सकाळची आरती – 11:00 AM
  • 🌇 संध्याकाळची आरती – 08:00 PM
  • 🪕 भजन संध्या – 10:00 PM

आजचे कार्यक्रम

  • आज कोणताही विशेष कार्यक्रम नाही 🙏

आगामी कार्यक्रम

  • सध्या कोणतेही आगामी कार्यक्रम नाहीत 🙏